कृषि उत्पन्न बाजार समिती, संगमनेर (जिल्हा - अहमदनगर)
बाजार समितीच्या स्थापनेची तारिख - दिनांक 19/11/1959
बाजार क्षेत्रांत समाविष्ट तालुक्यातील गावे - 171 (संपूर्ण संगमनेर तालुका)
बाजार समितीचे उपबाजार आवार - संगमनेर ,साकूर, घारगांव, वडगाव पान, निमोण ,तळेगावं, आश्वी बु ।।, कर्जुले पठार
जनावरांचा बाजार - संगमनेर, साकूर, वडगावपान
सरकारी जाहीरनामा क्रमांक एपीएम-10 दिनांक 2 जुन 1965 अन्वये दिनांक 19-6-1965 पासून संगमनेर येथील मुख्य बाजार आवारावर शेतीमालाच्या निमोण खरेदी–विक्रीचे व्यवहार सुरु झाले. या मुख्य बाजार आवाराचे 6 हेक्टर 27 आर एवढे आहे.
"संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही स्थापनेपासूनच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे. शेतकऱ्यांसाठी सातत्याने विधायक उपक्रम राबवणे, बाजार समितीत नवनवीन सुविधा उपलब्ध करुन देणे यामुळे संगमेनर बाजार समिती राज्यातील एक आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती ठरली आहे. ह्यासह बाजार समितीत बंतोष ही नवीन संगणकीय प्रणाली कार्यरत केली जात असून त्यामुळे संगमनेर बाजार समिती आता हायटेक होत आहे."