new-img

वेस्ट-डी कंपोजर चे फायदे ऐकून थक्क व्हाल

वेस्ट-डी कंपोजर चे फायदे ऐकून थक्क व्हाल

https://youtube.com/shorts/20DyQU80MSo

वेस्ट डी कंपोजरचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न हमखास वाढणार पण कसे तर ते ही सांगते. वेस्ट डिकंपोजर हे शेणातुन शोधलेलं द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये सूक्ष्मजीव आढळतात जे पिकांचे अवशेष, शेण, सेंद्रिय कचरा खातात आणि झपाट्याने वाढतात. जमिनीत सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढवतात. जिथे हे टाकले जाते तिथे एक साखळी तयार होते, जी काही दिवसात शेण आणि कचरा विघटित करून कंपोस्ट बनते. हे जमिनीतील सेंद्रिय सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवते जे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर ते जमिनीत टाकले तर ते जमिनीत असलेल्या हानिकारक रोग-जंतूंच्या संख्येवर नियंत्रण ठेवते. आणि जमीन निरोगी होण्यास मदत होते. अशा पद्धतीने शेतकरी वेस्ट डी कंपोजर वापर करून शेतीत हमखास उत्पन्न वाढवू शकतात.