मुरघास तयार करण्यासाठी सोपी पद्धत
- By - Team Agricola
- Jan 16,2025
मुरघास तयार करण्यासाठी सोपी पद्धत
मुरघास तयार करण्यासाठी, हिरव्या चाऱ्याला कुट्टी करून, हवा विरहित जागेत साठवले जाते. या पद्धतीत चारा चांगल्या अवस्थेत राहतो.
१ मुरघास तयार करण्यासाठी मक्का, ज्वारी, बाजरी यांच्या हिरव्या चाऱ्याचा वापर करता येतो.
२ चारा कापताना, एकदल चारा दाणे चिकात असताना आणि द्विदल चारा फुलोऱ्यात असताना कापावे.
३ चारा कुट्टी करून घ्यावा.
४ मुरघास तयार करण्यासाठी खड्ड्यात किंवा पिशव्यामध्ये चारा भरून दाबून ठेवावा.
५ मुरघास तयार करण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद वापरता येतो. ६ मुरघास तयार करण्यासाठी प्लॅस्टिक ड्रमचाही वापर करता येतो.