पीक विमा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, १५ जानेवारी पर्यंत मुदतवाढ
- By - Team Agricola
- Jan 08,2025
पीक विमा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, १५ जानेवारी पर्यंत मुदतवाढ
असा करा अर्ज?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. २०२४-२५ मधील अधिसूचित पिकांचा विमा उतरवण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली होती आता ती १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम तारखेपूर्वी आपल्या पिकांचा पीक विमा काढावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा करा अर्ज?
बँकेच्या शाखेतून अर्ज करण्यासाठी, तुम्ही जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊ शकता. याशिवाय, अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/ वर जाऊन अर्ज करू शकता. तुम्ही कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक 14447 वर देखील संपर्क साधू शकता. पीएम क्रॉप इन्शुरन्सच्या नोंदणीसाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुकची फोटो कॉपी आणि जमिनीशी संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक आहे.