new-img

उन्हाळी मूग अशी करा लागवड.

उन्हाळी मूग अशी करा लागवड

https://youtube.com/shorts/IbRTpVLAYU0

उन्हाळी मूग लागवड करायची असेल तर हा कामाचा व्हिडीओ आताच सेव्ह करा. उन्हाळी मूग लागवडीसाठी पेरणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च यादरम्यान करावी. पेरणीस फार उशीर करू नये, अन्यथा पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते. उन्हाळी मूग लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्यात उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. पिकास २१ ते २५ अंश सें. ग्रे तापमान चांगले मानवते. उन्हाळी मूगास पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करून रान बांधणी करावी. एकरी पाच ते सहा किलो बियाणे पुरेसे आहे. घरचे बियाणे वापरल्यास दर तीन वर्षांनी त्यात बदल करावा. बाकी हा कामाचा व्हिडीओ तुमच्या मूग लागवड करणाऱ्या इतर शेतकरी मित्रांना देखील नक्की पाठवा.