new-img

मेंढी पालन करून कमवा बक्कळ पैसा

मेंढी पालन करून कमवा बक्कळ पैसा

https://youtube.com/shorts/6VdCQagrSRo

शेती व्यवसायला सह जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्ही मेंढीपालन व्यवसाय करून बघा. पशुपालनात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे शेळी आणि मेंढी पालन. जर तुम्हाला पशुपालनाची आवड असेल तर तुम्ही मेंढी पालन करावे. कारण मेंढी पालनात बक्कळ कमाई आहे. मेंढीच्या काही जाती आहेत, त्यांची कमाई अधिक असते. जसे की महाराष्ट्रामध्ये डेक्कनी, माडग्याळ या जातीच्या मेंढ्या आढळतात. डेक्कनी मेंढ्या मांस उत्पादनासाठी चांगल्या असतात. माडग्याळ मेंढ्यांचे खास वैशिष्ट्य असे आहे की या जातीच्या मेंढ्यांच्या नर आणि मादी दोन्हीला शिंग येत नाही. गद्दी मेंढीतून वर्षातून तीनदा लोकर मिळते. त्यानंतर मुजफ्फर नगरी, जालौनी, पुंछी, करणाह, मारवाडी या मेंढ्यातून चांगला नफा पशुपालक शेतकरी कमवू शकता आहे.